जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे.
जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन १९७१ मध्ये झाली असून या क्रीडा संचालनालयामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे माध्यमातून जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन व राज्याच्या क्रीडा विकासाशी निगडित योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येते. राज्य शासनामार्फत क्रीडा विकासाकरीता राज्य व जिल्हा स्तरावर अनेक योजना / उपक्रम राबविण्यात येतात. या योजना / उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. क्रीडा ही मानवास प्राप्त झालेली निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येक मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रीडा क्षेत्राशी जुळलेला असतो. काही जण थेट स्वरूपात तर काही जण सहाय्य करण्याच्या भूमिकेतून या क्षेत्ाशी निगडित लेले असतात.
महाराष्ट्रातील जळगांव जिल्हयाला विविध क्षेत्रात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्याच प्रमाणे क्रीडा क्षेत्रात सुध्दा जळगांव जिल्हयाचे नांव लौकीक सॉफ्टबॉल, कुस्ती, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल बॅडमींटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग,बेसबॉल, क्रिकेट या क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. याच अनुषंगाने जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने राज्यस्तर व जिल्हास्तर विविध क्रीडा विकास योजना व क्रीडा कार्यक्रम बाबत माहीती संकेतस्थळ व्दारा उपलब्ध करुन दिली ही नक्कीच चांगली बाब आहे. या संकेत स्थळावर जळगांव जिल्हयातील क्रीडा संस्कृती , क्रीडा संबंधी योजना, क्रीडा स्पर्धा, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा कार्यक्रम इत्यादी बाबतची महत्वपूर्ण माहीती समाविष्ट करण्यात आलेली आहे. मला खात्री आहे की, हे संकेतस्थळ सर्व क्रीडापटू क्रीडातज्ञ, विशेषत: खेळाडू व क्रीडा क्षेत्राशी जुळलेल्या सर्व व्यक्तीना अत्यंत उपयुक्त ठरेल. जळगांव जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना, क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा प्रेमी यांना पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.